– “समृद्धीसाठी सत्यनिष्ठा” ही मध्यवर्ती संकल्पना; २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम
गोंदिया : केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) गोंदियातर्फे २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत “दक्षता जनजगृती सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या वर्षीच्या सप्ताहासाठी “समृद्धीसाठी सत्यनिष्ठा” ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध उपक्रमांची आखणी केली आहे.
सप्ताहादरम्यान राबविण्यात येणारे प्रमुख उपक्रम:
- बस स्थानक, रेल्वे स्टेशन तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
- आउटर रिंग रोड येथील ‘मॉर्निंग वॉक पॉईंट’वर नागरिकांना पत्रके वाटण्यात येणार आहेत.
- हर्बल लाईफ हेल्थ क्लब, चांडनी चौक, गोंदिया येथे ‘महिला जनजागृती’ कार्यक्रमाच्या माध्यमातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती दिली जाईल.
- व्हॉट्सॲप संदेश, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधला जाणार आहे.
- गावात ग्राम भेट देऊन गर्दीच्या ठिकाणी स्टिकर्स व पोस्टर्स लावून तसेच नागरिकांना पत्रके वाटून भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाबाबत जनजागृती केली जाईल.
नागरिकांना निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन:
लाचलुचपत प्रतिबंधक विभातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणत्याही सामान्य नागरिकाची भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार असेल, तर त्यांनी न घाबरता निर्भयपणे पुढे येऊन भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विभागाला सहकार्य करावे.
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा:
• गोंदिया घटक कार्यालय पत्ता: गोंदिया, तिरोडा रिंग रोड, रेल्वे क्रासिंग जवळ, गोंदिया (पिन – ४४१६०१)
दूरध्वनी क्रमांक: ०७१८२-२५१२०३ / ९२०९०४१०६४
व्हॉट्सॲप क्रमांक: ९२०९०४१०६४
ई-मेल आयडी: acbgondia@gmail.com








