भक्ती अन् मनोरंजनाचा मेळ! देवरीच्या धुकेश्वरी मंदिरात ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रौत्सव

गोंदिया ( देवरी ) : येथील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत धार्मिक विधींसोबतच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनासाठी मिना बाजाराचे खास आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्ट व उत्सव समितीने दिली आहे.
उत्सवाची सुरुवात १० ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी ६ वाजता मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाने होणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत मनोकामना ज्योती प्रज्वलन व घटस्थापना केली जाईल.
असे असतील दैनिक कार्यक्रम:
• १२ ऑक्टोबर: रात्री ७:३० वाजता – भजन संध्या
• १३ ऑक्टोबर: रात्री ७:३० वाजता – ओपन दांडिया स्पर्धा
• १४ ऑक्टोबर: रात्री ७:३० वाजता – देवी जगराता (जबलपूर प्रस्तुत)
• १५ ऑक्टोबर: रात्री ७:३० वाजता – सर्व गटांसाठी धार्मिक एकल व सामूहिक नृत्य स्पर्धा
• १६ ऑक्टोबर: रात्री ७:३० वाजता – जस झाकी (नवाटोला)
• १७ ऑक्टोबर: रात्री ७:३० वाजता – भव्य संगीत भजन स्पर्धा
• १८ ऑक्टोबर (अष्टमी): हवन विधी, सायंकाळी रांगोळी, हार व थाळी सजावट स्पर्धा; रात्री ७:३० वाजता ‘सुपर वुमन नृत्य स्पर्धा’
• १९ ऑक्टोबर (सांगता): सायंकाळी ६ वाजेपासून साडी वितरण, मनोकामना ज्योती विसर्जन आणि महाप्रसाद वितरण
आकर्षक विद्युत रोषणाई अन् मिना बाजार:
यावर्षी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून संपूर्ण मंदिर परिसरात भव्य व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. तसेच लहान-मोठ्यांच्या मनोरंजनासाठी भव्य मिना बाजार आणि इलेक्ट्रिक आकाश झुले सज्ज असणार आहेत.
या सर्व धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा तसेच महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मॉ धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट व नवरात्र उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!