उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

गोंदिया : राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ.उदय सामंत हे शुक्रवार दि.21 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8 वाजता नागपूर येथून मोटारीने नवेगावबांध ता.अर्जुनी मोरगाव कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता नवेगावबांध येथे “पुस्तकांचे गाव नवेगावबांध” उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11 वाजता नवेगावबांध येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण.
         दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गोंदिया जिल्हा उद्योग विभाग (CMEGP) व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गोंदिया जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत संवाद. दुपारी 2 वाजता पोवार बोर्डींग लक्ष्मीनगर गोंदिया येथे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मराठी भाषा विभाग आढावा बैठक तसेच साहित्यिकांसमवेत संवाद. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पत्रकार परिषद. तदनंतर सायंकाळी 6 वाजता गोंदिया येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!